DRDO ने भारतीय सैनिकांसाठी बनवले खास ‘अभेद’ बुलेटप्रूफ जॅकेट, बंदुकीच्या गोळीचाही होणार नाही परिणाम; वाचा काय आहे खास

DRDO Developed ABHED bulletproof jacket: भारतीय सैन्याच्या सुरक्षेसाठी DRDO द्वारे खास बुलेटप्रूफ जॅकेट तयार केले आहे. IIT दिल्लीच्या DRDO इंडस्ट्री अकेडमी सेंटर ऑफ अॅक्सिलेंसने (DIA-CoE) ABHED नावाचे (अॅडवान्स्ड बॅलिस्टिक्स फॉर हाय अॅनर्जी डिफिट) हे जॅकेट तयार केले आहे. विशेष म्हणजे हे जगातील सर्वात हलक्या बुलेटप्रूफ जॅकेट्स पैकी एक आहे.
ABHED बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये काय खास आहे?
या बुलेटप्रूफ जॅकेटवर 7.62 mm कॅलिबर एके सीरिजच्या बंदुक व स्नाइपर गोळीचा कोणताही परिणाम होणार नाही. याशिवाय, 5.56 एमएम कॅलिबर स्टँडर्ड असॉल्ट रायफल, 9 एमएम कॅलिबरच्या हँडगन्स, सबमशीन गनचाही कोणताही परिणाम होतनाही. एवढेच नाही तर ग्रॅनेड्स व अन्य विस्फोटकांपासून देखील जवानांचा बचाव होईल.
हे जॅकेट कोणत्याही आपताकालीन स्थिती व युद्धाच्या वेळी सैनिकांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. रिवॉल्वर अथवा एसएलआर सारख्या रायफलच्या गोळ्यांपासून देखील सैनिकांचा बचाव होईल.
जॅकेटचे वजन खूपच कमी
या जॅकेटमध्ये बॅलेस्टिक प्लेट्सचा वापर करण्यात आला असून, या प्लेट्सची निर्मिती सिरेमिक आणि अल्ट्रा-हाय मॉलिक्यूलर वेट पॉलिइथाईलीनचा वापर करून करण्यात आली आहे. यामुळे हे जॅकेट वजनाला तर हलके आहेच, सोबतच मजबूत देखील आहे.
बुलेटप्रूफ जॅकेट्सचे वजन जास्त असल्याने घालून चालण्यास सैनिकांना समस्या येत असे. मात्र, अभेद जॅकेटचे वजन केवळ 9 किलो आहे. हे वजन आधीच्या जॅकेटच्या तुलनेत 20-30 टक्क्यांनी कमी आहे. हलक्या वजनाच्या जॅकेटमुळे जवानांना ऑपरेशनच्या वेळीस त्वरित हालचाल करणे शक्य होते.
अभेद जॅकेट हे एखाद्या कवचप्रमाणे कार्य करते. हे जॅकेट अर्ध्या शरीराचे रक्षण करण्यास सक्षम आहे. ऑपरेशन दरम्यान काही गोळ्या लागल्या तरीही जवान सुरक्षित राहू शकतात. यातील बॅलेस्टिक प्लेट्सचे टेस्टिंग देखील करण्यात आले. असॉल्ट रायफल्स आणि स्नाइफर रायफल्सचा टेस्टिंग दरम्यान वापर करण्यात आला होता.
भारतीय जवानांना या बुलेटप्रुफ जॅकेट्सचा विशेष फायदा होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियान राबवताना आणि LAC जवळ गस्त घालताना कोणत्याही प्रसंगी हे जॅकेट सैनिकांची सुरक्षा करू शकते.





