Pune News : डॉ. सुनील ठाकरे यांना आयएसटीईचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार जाहीर
Pune News : प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे यांची इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) महाराष्ट्र-गोवा विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६ च्या प्रतिष्ठित ‘उत्कृष्ट प्राचार्य - पदवी’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Pune News : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्चचे (पर्वती) प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे यांची इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) महाराष्ट्र-गोवा विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६ च्या प्रतिष्ठित ‘उत्कृष्ट प्राचार्य – पदवी’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. (Pune News)
या सन्मानामुळे अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावणे, अध्यापनात तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण उपक्रमांचा वापर, संशोधन आणि स्टार्टअप-इनोव्हेशनला दिलेली चालना या उल्लेखनीय कामगिरीच्या निकषांवर त्यांची ही निवड करण्यात आली. (Pune News)
आयएसटीईचे महाराष्ट्र-गोवा विभाग अध्यक्ष डॉ. रणजित सावंत व सचिव प्रा. के. पी. कुंभार यांनी अधिकृत पत्राद्वारे ही माहिती दिली. येत्या २ नोव्हेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला जाईल. या यशाबद्दल संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. ठाकरे यांचे अभिनंदन केले. (Pune News)

