Dr. Sejal Pawar : मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर जोक करणाऱ्या डॉ. सेजल पवारवर मोठी कारवाई
या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली मेडिकलची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार (Dr. Sejal Pawar) हिला दोषी ठरवत महाविद्यालयातून १५ दिवसांसाठी निलंबित (सक्तीची रजा) करण्यात आले आहे.

Dr. Sejal Pawar : एका कॉमेडी शोदरम्यान मृतदेहाच्या गुप्तभागाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईच्या प्रसिद्ध केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली मेडिकलची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार (Dr. Sejal Pawar) हिला दोषी ठरवत महाविद्यालयातून १५ दिवसांसाठी निलंबित (सक्तीची रजा) करण्यात आले आहे.
दुसरीकडे, वाढता वाद पाहून या शोचा सूत्रसंचालक आणि कॉमेडियन प्रणित मोरे यानेही जाहीर माफी मागितली आहे. तसेच गृह विभागाने प्रणित मोरेच्या सर्व जुन्या व्हिडिओंची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण? (Dr. Sejal Pawar)
प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका शोमध्ये केईएम रुग्णालयाची वैद्यकीय विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार (Dr. Sejal Pawar) सहभागी झाली होती. या शोदरम्यान तिने शवविच्छेदनासाठी येणाऱ्या मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अत्यंत धक्कादायक आणि अश्लील विधान केले. या संभाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले, ज्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला.
KEM प्रशासनाची ‘ॲक्शन’ आणि मोठी कारवाई (Dr. Sejal Pawar)
व्हिडिओची गंभीर दखल घेत केईएम रुग्णालय प्रशासनाने तातडीने एक प्राथमिक चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशीत सेजल पवार प्रथमदर्शनी दोषी आढळली. त्यानंतर प्रशासनाने तिच्यावर खालीलप्रमाणे कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली. डॉ. सेजल पवारला पुढील १५ दिवसांसाठी कॉलेज आणि क्लासेसला येण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे.
या कालावधीत तिला केईएम रुग्णालय परिसर, वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतिगृहात (Hostel) प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. कारवाईनंतर सेजलला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आणि ट्रोलिंगमुळे तिच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ नये, तसेच नैराश्य किंवा मानसिक तणाव टाळण्यासाठी संस्थेने तिला मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला आहे.
सखोल चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती (Dr. Sejal Pawar)
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आता एक उच्चस्तरीय 5 सदस्यीय समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या समितीत:
१. एक निवृत्त वरिष्ठ प्राध्यापक
२. एक वरिष्ठ पत्रकार
३. वैद्यकीय महाविद्यालयातील तीन प्राध्यापक
यांचा समावेश असेल. ही समिती व्हायरल व्हिडिओ, त्यामागील तथ्ये आणि त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास करून पुढील ७ दिवसांच्या आत आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे.
गृह विभागाचे आदेश आणि कॉमेडियन प्रणित मोरेची माफी (Dr. Sejal Pawar)
या प्रकरणाची तीव्रता पाहता राज्याच्या गृह विभागानेही यात हस्तक्षेप केला आहे. कॉमेडियन प्रणित मोरे याने आतापर्यंत सोशल मीडियावर अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओंची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. चौकशीचे आदेश निघताच आणि चहुबाजूंनी टीका होऊ लागल्याने अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर आला आहे. त्याने हात जोडून या प्रकरणाची जाहीर माफी मागितली आहे.
KEM रुग्णालयातील डॉक्टर आणि त्या मुलाला आक्षेपार्ह बोलण्यापासून मी रोखू शकलो असतो. पण माझ्याकडून चूक झाली. मला एक संधी द्या, मी एक चांगला व्यक्ती आहे,” अशी आर्त साद प्रणितने मागितलेल्या माफीत घातली आहे.
वैद्यकीय क्षेत्रासारख्या पवित्र व्यवसायात असणाऱ्या व्यक्तीकडून मृतदेहाचा असा अनादर झाल्याने सध्या वैद्यकीय विश्वातून आणि सर्वसामान्य जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता ७ दिवसांत येणाऱ्या समितीच्या अहवालानंतर सेजल पवारवर (Dr. Sejal Pawar) आणखी काय मोठी कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






