Pimpri : डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन

कार्ला : येथील श्री एकविरा देवी ही आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. बुधवारी (दि.१) नवीन वर्षाची सुरूवात करीत असताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एकविरा देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या भगिनी जेहलम जोशी याही उपस्थित होत्या.
नवीन वर्ष महाराष्ट्रासह देशाला सुख समाधानाचे, शेतकऱ्यांना न्याय देणारे असावे. त्यासोबतच सर्वांना आरोग्य, सौख्य, यश आणि विजयलक्ष्मी प्राप्त व्हावी, अशी प्रार्थना डॉ. गोऱ्हे यांनी देवीच्या चरणी केली.
त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे यश मिळाले त्याबद्दल एकविरा देवीला केलेला नवस त्यांनी फेडला. डोंगरावरील देवी माता आणि पायथा मंदिर या दोन्ही ठिकाणी देवीला साडी-ओटीचा नैवेद्य अर्पण केला.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, उद्योजक अशोक पडवळ, पोलीस पाटील अनिल पडवळ, मंदिर व्यवस्थापक संतोष देवकर, पुजारी तेजस तात्या खिरे, मा सरपंच दत्तात्रय पडवळ आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.





