Satara | कराड दक्षिणचे नंदनवन होण्या साठी डॉ. अतुल भोसलेंना पाठबळ द्या

कोळे, (वार्ताहर) – ग्रामीण विकासाला केंद्रबिंदू मानून भोसले कुटुंबाने नेहमीच काम केले आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी आमदार नसतानाही कोट्यवधींचा विकासनिधी आणला.
आमदार नसताना जर ते एवढा विकासनिधी आणत असतील, तर आमदार झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे कराड दक्षिणमधील जनतेने डॉ. अतुल भोसलेंना पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी आमदार आनंदराव पाटील यांनी केले.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कोळे येथे मंजूर झालेल्या विविध रस्ते व पाणंद रस्त्यांचे उद्घाटन व भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, अजय पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून आणि केंद्र व राज्यातील भाजप–महायुती सरकारच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पेयजल योजनांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे.
याशिवाय रस्ते विकास, ग्रामीण विकासासाठी भरघोस निधी मिळाला आहे. कृष्णा समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असून, आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत.
आमदार नसताना दसपट निधी आणण्याचे कर्तृत्व डॉ. अतुल भोसले यांनी दाखविले आहे. त्यामुळे कराड दक्षिणमधील जनतेने डॉ. अतुल भोसले यांच्यासारखे कार्यक्षम नेतृत्व निवडण्याची गरज आहे.
ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांनी आत्तापर्यंत जवळपास ७०० कोटींपेक्षा जास्त निधी आणला.
गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणचा चौफेर विकास झाला असून, या विकासाला गती देण्यासाठी डॉ. अतुल भोसलेंना येत्या निवडणुकीत नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी.
डॉ. अतुल भोसले यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणसाठी आलेल्या विकासनिधीचा आढावा घेतला.
यावेळी कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, विंगचे उपसरपंच सचिन पाचपुते, पांडुरंग सावंत,
राहुल चव्हाण, साहेबराव देसाई, अस्लम देसाई, महेश पाटील, अहमद देसाई, अतुल घोणे, श्रीरंग कुंभार, निसार मुजावर, अशोक शिनगारे, निवास मोरे, तेजस पाटील, विनायक कुंभार, राहुल कुंभार, प्रसाद लटके, महेश लाटे, चेतन पवार, मनोज कुंभार, राम जाधव आदींसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
या कार्यक्रमात कोळे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कराळे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, राजेश देसाई, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील,
सोसायटीचे संचालक संतोष दादासो पाटील, गोसावी समाजाचे अध्यक्ष बाबुराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.



