Eye Hospital : डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचा 15वा वर्धापन दिन सोहळा संपन्न
Eye Hospital : प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामचंद्र पाडळकर उपस्थित

Eye Hospital : डॉ. दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचा १५ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक १८ जुलै २०२६ रोजी नेत्रालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रामचंद्र पाडळकर उपस्थित होते.अविरतपणे रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयाने वर्धापन दिनाचे औचित्य साधत एकाच दिवशी १०० लेसिक शस्त्रक्रिया करण्याचा स्तुत्य संकल्प केला.
आपल्या भावना व्यक्त करताना नेत्रालयाचे संचालक डॉ. अनिल दुधभाते यांनी, रुग्णालयाच्या या १५ वर्षांच्या यशस्वी प्रवासात मोलाचा हातभार लावणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “माझ्या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण कायम समाधानी झाला पाहिजे आणि इथून जाताना एक नवी, स्पष्ट दृष्टी घेऊनच घरी परतला पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे.”
तर अध्यक्षीय भाषणात डॉ. रामचंद्र पाडळकर यांनी डॉ. दुधभाते नेत्रालयाच्या उच्च दर्जाच्या गुणवत्तापूर्ण सेवेचे, अत्याधुनिक सुविधांचे आणि रुग्णांशी असलेल्या स्नेहपूर्ण नातेसंबंधांचे कौतुक केले. तसेच डॉ अनिल दुधभाते यांचे कामाबद्दल समर्पण व स्टाफच्या उत्कृष्ट कामाबद्दल गौरवोद्गार काढून सर्वाचे अभिनंदन केले व डॉक्टरांच्या भविष्यातील प्रवास आणि प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला डॉ. दुधभाते यांच्या प्रेरणास्थान डॉ. डिंपल दुधभाते, रुग्णालयाच्या सी.ई.ओ. प्रियंका एडके, डॉ. आसावरी चव्हाण, डॉ. आदिती एडगिरी, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. स्नेहल मानपुत्र, शीतल हिराळकर, गौरी निमकर, गणेश मोटे, कोमल भोसले यांच्यासह नेत्रालयाचा सर्व कर्मचारी वर्ग आणि डॉ. दुधभाते ऑटोमेट्री कॉलेजचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांसाठी चविष्ट उपहार आणि चहापानाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने या सोहळ्याची सांगता झाली.
हेही वाचा:



