डॉ.दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी; अंनिसचे आंदोलन
Updated On:

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्ष झाली. त्यांच्या मारेकऱ्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. डॉ.दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आज महर्षी विठ्ठल रामजी पुलावर ‘जवाब दो’ आंदोलन केले.





