पुणे | डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात आरती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेतकरी, विद्यार्थ्यांसह माता- भगिनी आणि सामान्य कामगारांसाठी जे काम करत आहे. ते काम अधिक करण्यासाठी बळ मिळो, अशी भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. गणेश पेठेतील निवडुंग विठोबा मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी शहरप्रमुख नाना भानगिरे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, सह संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाई, महिला शहरप्रमुख श्रद्धा शिंदे, यासह युवराज शिंगाडे, धनंजय जाधव, गणेश काची, सुधीर जोशी, तसेच महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याबद्दल आणि शिवसेनेचे आठ खासदार निवडून आल्याबद्दल पांडुरंगाचे आशीर्वाद आम्हाला मिळाले, अशी भावना व्यक्त करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या सुरू असलेल्या कामाला आणखी बळ आणि आशीर्वाद देवो, हीच विठुरायाकडे प्रार्थना.





