Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकार 2.0 चा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. मात्र अशा देखील काही घोषणा आहेत ज्या तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही या बजेटमध्ये रस असेल, तर तुम्ही तुमच्या फोनवरूनच पीडीएफ फाइलमध्ये बजेटची संपूर्ण प्रत डाउनलोड करू शकता.
अर्थसंकल्प 2024 ची प्रत या वेबसाइटवरून डाउनलोड करा
तुमच्या लॅपटॉपवरून www.indiabudget.gov.in ला भेट द्या.
आता “Budget Speeches” या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर “बजेट 2024” वर क्लिक करा.
आता तुम्ही नवीन विंडोवर जाल आणि तुम्हाला डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
आता डाउनलोड पर्यायावर क्लिक करून बजेट PDF मध्ये डाउनलोड करा.
किंवा तुम्ही थेट पुढील लिंकवर क्लीक करून देखील डाउनलोड करू शकता – https://www.indiabudget.gov.in/doc/budget_speech.pdf
बजेट 2024 ची प्रत मोबाईलवरून याप्रमाणे डाउनलोड करा
तुमच्या फोनवरून www.indiabudget.gov.in ला भेट द्या.
आता “Download Mobile Application” या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्ही त्या पेजवर पोहोचाल जिथून ॲप डाउनलोड करता येईल.
तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्याकडे आयफोन असेल तर ॲप स्टोअर आयकॉनवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या फोनवर ॲप डाउनलोड करा.ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही पीडीएफ कॉपीमध्ये बजेट डाउनलोड करू शकता.किंवा थेट https://www.indiabudget.gov.in/doc/budget_speech.pdf या लिंकवर क्लीक करून देखील तुम्ही मोबाईलमध्ये पीडीएफ डाउनलोड करू शकता (ही लिंक काही फोनमध्ये चालणार नाही )
Download PDF of Budget 2024 | PDF of Budget | Budget 2024 PDF Download