खुशखबर! कोतवालांच्या मानधनात दुपटीने वाढ, आता दरमहा ‘एवढे’ मानधन मिळणार
Updated On:

मुंबई – राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता 7 हजार 500 वरून 15 हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक 17 मार्च, 2023 रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन 7 हजार 500 रुपयावरून 15 हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 12 हजार 793 कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट 15 हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. 15 हजार रुपये इतके मानधन दि. 1 एप्रिल 2023 पासून अनुज्ञेय असणार आहे.
टॅग्स:





