“माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही”; जयंत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटलांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आंदोलनात ‘माझ्याबद्दल शंका आहे, त्यामुळे तुम्हाला हमी देणं जरा धोक्याचं आहे’, असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदानावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जयंत पाटलांनी भेट दिली आणि आंदोलकांशी संवाद साधला.
“राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की, तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली माझी गॅरंटी घेऊ नका. माझं काही खरं नाही. कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. माझा सल्ला राजू शेट्टी ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा, संघर्ष करायला ठाम रहा, मोजणीला अटकाव ठेवा. आमचा दारुण पराभव झाला. आम्ही बोलायचं हळूहळू कमी झालोय, कारण बोलून लोकांना काही समजत नाही. राजू शे्ट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. Jayant Patil |
विकासासाठी आमचा विरोध नाही, पण…
‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’, असंही म्हणत जयंत पाटील यांनी राजू शेट्टींना मिशकील टोला यावेळी लगावला. सरकार नवे नवे रस्ते करण्यात का इंटरेस्ट घेते हे कळत नाही, मोठे प्रकल्प घ्यायचे त्यातून निधी उपलध करायचा. राजू शेट्टी यांना माहिती आहे की, निवडणुकांमध्ये किती पैसे वाटले जातात, त्यांना चांगला अनुभव आहे. विकासासाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जमीन जात असेल त्यांची उपजिवीका दुसरी काही नसेल तर काय. नियमाने इकडे तिकडे असं करू नका, सरकार पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर व्हा. आम्ही भाषण करुन दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते. निर्धाराने आलात तर निर्धार टिकला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी आंदोलकांना उद्देशून म्हटले. Jayant Patil |
लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टींना महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याच्या दिलेल्या प्रस्तावाबद्दल जयंत पाटलांनी सांगितला. “मी म्हटलं आम्ही राजू शेट्टींचा प्रचार करणार आहे. तुम्ही आमच्याकडून उभं रहा. त्यावेळी काय,वेळ बदल असतो. सांगायचा मुद्दा काय तर ते आज खासदार राहिले असते, तर लोकसभेत भाषण करता आलं असते. ते झाले असते खासदार. पण, ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. बंटी पाटील साक्षीदार आहेत”, असा किस्सा जयंत पाटलांनी सांगितला.
हेही वाचा:
Pune : एसटी प्रशासनाचे पुणे पोलीस आयुक्तांना पत्र; स्वारगेट प्रकरणानंतर ‘हा’ मोठा निर्णय घेतला जाणार





