पुणे जिल्हा | परीक्षा देऊन घरी बसू नका

पळसदेव, (वार्ताहर) – ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भविष्य काळात शहरातून पंच बोलावण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र या वेळी परीक्षा दिलेल्या पंचांनी पुढील काळात कार्यरत राहणे आवश्यक आहे. परीक्षा देऊन घरी बसू नका, मुख्य प्रवाहात कायम रहा, असा सल्ला राष्ट्रीय पंच नारायण काळे यांनी व्यक्त केले.
पळसदेव तालुका इंदापूर येथे एस. बी. स्पोर्ट शिंदे वस्ती येथे शनिवारी (दि. 22) व रविवारी (दि. 23) जिल्हास्तरीय पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नारायण काळे बोलत होते. इंदापूर तालुक्यात तब्बल 10 वर्षांनंतर प्रथमच ग्रामीण भागात जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या वेळी इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर, भोर या तालुक्यांतून परीक्षेसाठी पंच उपस्थित होते.
यावेळी सुमारे 35 पंचांनी परीक्षा दिली असल्याची माहिती एसबी स्पोर्टचे अध्यक्ष सागर बनसुडे यांनी दिली.
यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हास्तरीय पंच परीक्षेसाठी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन संयुक्त सचिव संदीप पायगुडे,
कार्यवाह योगेश यादव, राष्ट्रीय पंच नंदकुमार काळोखे, तानाजी शिंदे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सदस्य सतपाल गावडे, शंभु भोपळे, चंद्रकांत रणवरे, रुपेश भालेराव, विलास शेलार यांच्यासह कबड्डी प्रशिक्षक उपस्थित होते.





