Rakhi Sawant : माझ्या नादी लागू नकोस..! राखी सावंत कोमल राणीवर भडकली; गोविंदाकडे केली ‘ही’ अजब मागणी, पहा व्हिडिओ
Rakhi Sawant : आता या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतने उडी घेतली आहे.

Rakhi Sawant : अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्याबाबत सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, सार्वजनिक ठिकाणी दोघे एकत्र दिसल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि कोमल राणी यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. यावेळीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावर मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मतं व्यक्त केली. काहींनी टीकाही केली होती.
या टीकेला कोमल राणीने सोशल मीडियावरून सडेतोड शब्दांत उत्तर दिले होते. तिने एक लांबलचक पोस्ट शेअर करत टीका करणाऱ्यांना समज दिली. तसेच कोणाचा जळफळाट होत असेल तर होऊ दे, असेही तिने म्हटले होते.
आता या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतने उडी घेतली आहे. पापाराझींशी संवाद साधताना राखीने कोमल राणीवर थेट निशाणा साधला. “ही कोमल कोण आहे? ती माझ्याबद्दल आणि इतर सेलिब्रिटींबद्दलही वायफळ बडबड करत आहे.” असं म्हणत तिच्यावर निशाणा साधला. तसेच माझ्या नादाला लागू नकोस मी सुनीता नाही, अशा शब्दांत फटकारलं.
View this post on Instagram
एवढ्यावरचं न थांबता राखीने कोमल राणीला ‘नवरा चोरणारी’ असं संबोधलं. याचवेळी राखीने गोविंदावरही नाराजी व्यक्त केली. “गोविंदाजी, संपूर्ण देश तुमच्यावर नाराज आहे. लहानपणापासून मी तुमचे चित्रपट पाहण्यासाठी जेवढे पैसे खर्च केले, ते आता परत हवे आहेत.” अशी अजब मागणीही राखीने केली. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान, राखी सावंतच्या या वक्तव्यावर गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार काय प्रतिक्रिया देतात का-, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sheikh Hasina: शेख हसीना बांगलादेशला कधी परतणार? ; भारताकडून मोठा खुलासा





