“गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”; निवडणुकांचा दाखला देत प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंवर निशाणा

Prakash Ambedkar | मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे समर्थकांसह जालन्याच्या अंतरवालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्या मान्य झाल्या नाही, तर आपण राज्यातील सरकारसुध्दा उलथून टाकू शकतो, असा इशारा जरांगे-पाटील यांनी सोमवारी दिला. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. Prakash Ambedkar |
प्रकाश आंबेडक यांची पोस्ट –
प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना सवाल केला आहे. “मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. इतकेच नाही तर अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील अनेक प्रस्थापित मराठा सत्तेत होते. ज्यामध्ये शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता,” असेही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले आहे. Prakash Ambedkar |
“तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?” असा सवालही आंबेडकरांनी या पोस्टच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. Prakash Ambedkar |
मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 25, 2025
अंतरवाली सराटीतून मोर्चाला सुरुवात
मराठा समाजातील बांधवांना २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चलो मुंबई मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचे त्यांनी जाहीर केले. Prakash Ambedkar |
शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही त्यांची मागणी आहे. २७ ऑगस्ट रोजी जालन्यातील आपल्या मूळगावी अंतरवाली सराटी येथून ते या मोर्चाला सुरुवात करणार आहेत.
तर २९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उपोषणास सुरुवात होईल. आंदोलनाच्या ठिकाणी कीर्तन, भजन आणि शाहिरांच्या पोवाड्यांचे कार्यक्रम होतील. Prakash Ambedkar |
हेही वाचा:
PMO Meeting : ‘ट्रम्प टॅरिफ’ लागू होण्यापूर्वी सरकार ऍक्शन मोडमध्ये ; PMO ची आज महत्वाची बैठक





