Mehboob Shaikh : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. तसेच जयंत पाटील यांच्या वडिलांवर देखील खालच्या शब्दांत त्यांनी टीका केली होती. यामुळे नवा वाद निर्माण झाला असून लोकनेते राजाराम बापू पाटील आणि जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. यानंतर सांगली येथील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्कृती बचाव या सभेत पडळकर यांच्या विधानाचा येथे उपस्थित असणाऱ्या पक्षातील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना पक्षाचे युवा नेते मेहबूब शेख यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली. आमच्या नेत्यावर कुणी बोललं तर… मेहबूब शेख यांनी यावेळी बोलताना पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना सांगली, कोल्हापूर आणि कराडमधील हॉटेलचा डेटा आपल्याला काढायला लाऊ नको, असा थेट इशारा दिला. आम्ही कुणाच्या खाजगी भानगडीत शिरत नाही. पण आमच्या नेत्यावर कुणी बोललं तर सोडत नाही. लयी खाजगी जायला लावू नको, असा देखील इशारा शेख यांनी यावेळी बोलताना दिला. पोखरवाडीत कोणत्या शिक्षकाने काय कारनामे केले ते सांगायची वेळ आमच्यावर आणू नको. पडळकर वाडीत कोण म्हातारा दारु पिल्यावर काय म्हणतो याचा देखील व्हिडीओ समोर आणायला लावू नको, असंही शेख यावेळी बोलताना म्हणाले. हा खर्जुला कुत्रा आमच्या मराठवाड्यात कुत्र्यांमध्ये तीन प्रकार आहेत. भाजपवाले म्हणतात गावाकडची भाषा आहे. खेड्यातले आहेत. आम्ही त्यापेक्षा जास्त खेड्यातले आहेत. आमच्या बीडमध्ये कुत्र्याचे तीन प्रकार आहेत. साधा कुत्रा, पिसाळलेला कुत्रा आणि खर्जुला कुत्रा. तसा हा खर्जुला कुत्रा आहे, अशी टीका मेहबूब शेख यांनी केली. तसेच या सभेतून पक्षातील जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेत्यांनेही गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका केली. हेही वाचा : पुराच्या पाण्यात अकडलेल्या कुटुंबासाठी ओमराजेंचा मदतीचा हात; एनडीआरएफच्यासोबत स्वत: पाण्यात उतरले अन्…