“लोक काय म्हणतील”च्या बेड्यांनी स्वत:ला जखडून घ्यायचे नाही; जुई गडकरीची पोस्ट

Actor Jui Gadkari | अभिनेत्री जुई गडकरी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेतील तिच्या साध्या, सोज्वळ भूमिकेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने इस्टाग्राम स्टोरीत आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
जुई गडकरीची पोस्ट –
जुईने असे लिहिले आहे की, “मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचले आहे की, लोकांना मी आवडत नाही याबद्दल मी ठीक आहे. लोकांना कथेतील माझा भाग समजून घेता येत नाही, याबद्दलही मी ठीक आहे. मी कोणालाही स्पष्टीकरण देण्यास बांधिल नाही. मी इथे माझे आयुष्य जगण्यासाठी आहे.”
पुढे ती म्हणाली, “लोक काय म्हणतील”च्या बेड्यांनी स्वत:ला जखडून घ्यायचे नाही, हेच मी निवडले आहे. मी शांतता निवडली आहे. मी माझे सत्य निवडले आहे. मी स्वत:ला निवडले आहे. ओके धन्यवाद”, अशी जुईने शेअर केली आहे. मात्र ती असे का आणि कोणाला म्हणत आहेत याबाबत अंदाज लावणे कठीण आहे. मात्र तिच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, जुईची ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. यात तिने सायलीची भूमिका साकारत सर्वांना आपलेसे केले आहे.
हेही वाचा:
पुणे कल्याणीनगर अपघाताप्रकरणी अनिल देशमुखांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप





