कोल्हापुरात गाढवांची दहशत ! धडक देऊन पायाला चावा घेतल्याने तीन जखमी.. Video Viral

Updated On:

कोल्हापूर – जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद सुरु असतानाच आता गाढवांनीही दहशत सुरु केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गाढवाने केलेल्या हल्ल्‌यात दोन पुरुषांसह एक शाळकरी मुलगी जखमी झाली आहे.

गाढवाने केलेल्या हल्ल्‌याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये गाढवाने धक्का देऊन रस्त्यावर पाडल्यानंतर पायाचा चावा घेताना दिसत आहे. मात्र, दगड काठीने मारूनही गाढव बाजूला होत नसल्याचे दिसून येते. त्यानंतर पाठिमागून आलेल्या एका तरुणाने काठीने सलग दणके दिल्यानंतर रस्त्यावर धडक देऊन पाडलेल्या वृद्धाची सुटका झाली.

गांधीनगरमध्ये विक्रम हायस्कूलच्या मैदानात मोकाट गाढवाने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये लक्ष्मण देऊ कुसाळे (वय 75) गोपीचंद वरुमल कामरा (वय 52 दोघे रा. वळीवडे, ता. करवीर) आणि मयुरी कुमार जाधव (वय 11 रा. पवार मळा, उचगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या जखमींवर गांधीनगरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गांधीनगर तसेच वळीवडे भागात भटक्‍या जनावरांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना आणि बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना होत आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Jyotiba Chaitra Yatra 2026 : जोतिबाच्या नावानं चांगभलं..! चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जोतिबाचा डोंगर दुमदुमला

2026-04-01 21:53:32

Jyotiba Chaitra Yatra 2026 : जोतिबाच्या नावानं चांगभलं..! चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जोतिबाचा डोंगर दुमदुमला

Kolhapur News : कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात राडा! पालखी सोहळ्यात पुजारी आणि भाविक भिडले; २५ जणांवर गुन्हे दाखल

2026-03-23 21:21:22

Kolhapur News : कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात राडा! पालखी सोहळ्यात पुजारी आणि भाविक भिडले; २५ जणांवर गुन्हे दाखल

Milk Price Hike : गोकूळ महासंघाकडून दूध दरात वाढ; ग्राहकांना झटका, प्रतिलिटर किती वाढले दर?

2026-02-20 17:46:42

Milk Price Hike : गोकूळ महासंघाकडून दूध दरात वाढ; ग्राहकांना झटका, प्रतिलिटर किती वाढले दर?

Hasan Mushrif : राष्ट्रवादीत बाहेरील हस्तक्षेपाची गरज नाही : हसन मुश्रीफ

2026-02-07 20:29:25

Hasan Mushrif : राष्ट्रवादीत बाहेरील हस्तक्षेपाची गरज नाही : हसन मुश्रीफ

Kolhapur Accident : कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात; क्रेटा कारची दुचाकीला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

2026-02-07 18:50:03

Kolhapur Accident : कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात; क्रेटा कारची दुचाकीला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू