करून दाखवलं…! पाच दिवसात तिला ५ सरकारी जॉबची ऑफर, ‘या’ यशासाठी टिनू सिंगने अवलंबला ‘हा’ मार्ग

success story – कठोर परिश्रम केले तर यश मिळवणे कठीण नाही… ही ओळ बिहारची लेक टिनू सिंगवर अगदी तंतोतंत लागू होते. जमुई येथील रहिवासी असलेल्या टिनू सिंगने कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर आपल्या आई-वडिलांची स्वप्ने तर पूर्ण केलीच पण संपूर्ण राज्यात यशाची पताका फडकवली आहे.
टिनूचे एकच स्वप्न होते की, ती सरकारी अधिकारी व्हावी. टिनूचे हे स्वप्न साकार करण्यासाठी तिने मेहनतीच्या जोरावर एक-दोन नव्हे तर पाच स्पर्धा परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण करून इतिहास रचला आहे. टिनूला पाच नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या आहे. नोकरी मिळवण्यासाठी तिने मोठी मेहनत घेतली. शेवटी तिच्या मेहनीला यश मिळाले आणि तिने एकाचवेळी ५ सरकारी परिक्षांत मोठी झेप घेतली. २२ ते २६ डिसेंबर या पाच दिवसांत तिला ५ सरकारी नोकऱ्यांसाठी ऑफर आल्यात. तिने या यशासाठी फक्त आणि फक्त मेहनत केली.
टिनू मूळची बिहार जमुई येथील आहे. तिचे वडील मुन्ना सिंग सीआरपीएफमध्ये सब इन्स्पेक्टर आहे. तिच्या आईचे नाव पिंकी सिंग असून ती गृहिणी आहे. टिनूने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ‘तिच्या आईची सरकारी शिक्षिका म्हणून निवड झाली होती, परंतु कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यावेळी त्यांनी नोकरी केली नाही.’
मीडियाशी संवाद साधताना टिनूने सांगितले की, ’22 डिसेंबर रोजी तिची पहिल्यांदा डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून निवड झाली होती. यानंतर, 23 डिसेंबर रोजी बिहार कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित पदवीधर स्तर परीक्षेत (CGL) सहायक शाखा अधिकारी (ASO) पदासाठी निवड केली. 25 डिसेंबर रोजी BPAC तर्फे इयत्ता 6 वी ते 8 वी च्या शिक्षक पदासाठी तर 26 डिसेंबर रोजी BPSC तर्फे इयत्ता 9 व 11 च्या शिक्षक पदांसाठी निवड करण्यात आली.’
टिनूने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे. आपल्या मुलीने अधिकारी व्हावे अशी टिनूच्या आई-वडिलांची नेहमीच इच्छा होती. आज टिनूने कुटुंबाचे स्वप्न तर पूर्ण केलेच पण जमुई जिल्ह्याला वैभव प्राप्त करून दिले आहे. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसमोरही टिनूने एक आदर्श ठेवला आहे.
टिनूने पाच सरकारी नोकऱ्यांपैकी सहाय्यक शाखा अधिकारी पद स्वीकारले आहे, कारण तिला नेहमीच अधिकारी व्हायचे होते. मात्र, टिनूने त्याच्या स्वप्नांना अद्याप पूर्णविराम दिलेला नाही. टिनूने सांगितले की, आता त्याचे स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचे आहे. ती यूपीएससीची तयारी करणार आहे.





