Shree Saibaba Sansthan | श्रीराम नवमी उत्सवनिमित्त साईबाबा चरणी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. यंदा रामनवमी उत्सव 5 ते 7 एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात आला होता. या 4 दिवसात साईचरणी भाविकांनी तब्बल 4 कोटी 26 लाखांचे दान दिले आहे. तर रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने अडीच लाखांहून अधिक साईभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दानपेटीत 1 कोटी 67 लाख 89 हजार 78 रूपयांच दान देण्यात आले आहे. तर देणगी काऊंटरवर 79 लाख 38 हजार रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून 47 लाख 16 हजार 800 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर डेबीट क्रेडीट कार्ड , क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी., मनी ऑर्डरच्या माध्यमातून 1 कोटी 24 लाख 15 हजार 214 रुपये मिळाले आहेत. 6 लाख 15 हजार रुपयांचे 83 ग्रॅम सोने तर 1 लाख 31 हजार रुपये किंमतीची 2 किलो चांदी दान स्वरुपात देण्यात आले आहे. एकूण 4 कोटी 26 लाख 07 हजार 182 रुपयांचे दान साईचरणी देण्यात आले आहे. ३ लाख ६३ हजार ७४ लाडू प्रसाद पाकिटांची विक्री उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे 1 लाख 61 हजार 529 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. दर्शन रांगेत 1 लाख 76 हजार 200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत 3 लाख 63 हजार 74 लाडूप्रसाद पाकिटांची विक्री झाली. या माध्यमातून 72 लाख 61 हजार 480 रुपये प्राप्त झाले. Shree Saibaba Sansthan | दरम्यान, रामनवमी उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होतात. पालखीसोबत येणाऱ्या पदयात्रेकरता साईबाबा संस्थानने निवासासाठी उत्तम सोय केली होती. रामनवमी उत्सव आणि पालखीचं एक वेगळ नातं असल्यानं या उत्सवासाठी खास करुन मुंबईहून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. अनेक वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. Shree Saibaba Sansthan | हेही वाचा : Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी झीशान अख्तरला अटक; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई