‘करा रक्तदान ठेवा माणुसकीचे भान’! दैनिक प्रभात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : रक्त कोणताही भेद न मानणारी गोष्ट, म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. करा रक्तदान ठेवा माणुसकीचे भान.. असा सामाजिक संदेश देत दैनिक प्रभातकडून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आणि समाजकार्याचा भाग म्हणून प्रभात कडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या शिबिराला तरुण वर्गासह सर्वच वयोगटातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच दैनिक प्रभाततर्फे रक्तदात्यांना रोपवाटपही देण्यात आले.

तसेच आपण केलेलं रक्तदान हे कोणाचा तरी जीव वाचवू शकतो अशी भावना यावेळी इथे आलेल्या रक्तदात्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, यावेळी “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, व्यवस्थापक रविकुमार इंडी इत्यादी उपस्थित होते.





