Trump FIFA Controversy : “फिफाने सर्व मर्यादा ओलांडल्या…!” अमेरिकन स्ट्रायकर बालोगनला वाचवण्यासाठी ट्रम्प मैदानात उतरल्याने युरोपियन देशांमध्ये संतापाची लाट
Trump FIFA Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपानंतर फिफाने अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फोलारिन बालोगन याच्यावरील 'रेड कार्ड'मुळे घातलेली बंदी तडकाफडकी हटवली आहे.

Donald Trump FIFA World Cup 2026 Folarin Balogun Red Card Controversy : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेचा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. मात्र, ‘राऊंड ऑफ १६’ च्या सामन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युरोपियन फुटबॉल चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपानंतर फिफाने अमेरिकेचा स्टार स्ट्रायकर फोलारिन बालोगन याच्यावरील ‘रेड कार्ड’मुळे घातलेली बंदी तडकाफडकी हटवली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे बालोगन आता ७ जुलै रोजी बेल्जियमविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात खेळू शकणार आहे. या प्रकारामुळे बेल्जियम आणि युरोपियन फुटबॉल विश्वात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमका काय आहे हा वाद? ट्रम्प यांनी मानले आभार –
१ जुलै रोजी बोस्निया आणि हर्जेगोविना विरुद्ध झालेल्या ‘राऊंड ऑफ ३२’ च्या सामन्यात बालोगनला मैदानाबाहेर काढत ‘रेड कार्ड’ दाखवण्यात आले होते. नियमानुसार त्याच्यावर पुढील सामन्यासाठी बंदी होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फिफाला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. ५ जुलै रोजी फिफाने ही बंदी उठवल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “योग्य काम करण्यासाठी आणि एका मोठ्या अन्यायाला मोडीत काढण्यासाठी फिफाचे मनापासून आभार!”
“५ जुलैला १ एप्रिल ठरवला…!” बेल्जियमचे प्रशिक्षक भडकले –
BREAKING: President Trump reveals the details of his conversation with FIFA President Gianni Infantino over the controversial red card call on star American player Folarin Balogun.
“All I did was ask for a review because I didn’t think it was a foul. And, you know, again, I’m… pic.twitter.com/MD5Q9t44th
— Fox News (@FoxNews) July 6, 2026
फिफाच्या या अभूतपूर्व निर्णयावर रॉयल बेल्जियन फुटबॉल असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतला आहे. बेल्जियमचे मुख्य प्रशिक्षक रुडी गार्सिया यांनी फिफाची खिल्ली उडवत म्हटले, “मला माहीत नव्हते की फिफाच्या कार्यालयात ५ जुलै रोजी १ एप्रिल (एप्रिल फूल) मानला जातो. विश्वचषकाच्या इतिहासात असा राजकीय हस्तक्षेप करून निर्णय बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे फुटबॉलच्या नैतिक मूल्यांना हरताळ फासणारे आहे.”
UEFA आणि फिफा आमनेसामने; रोनाल्डोच्या नियमाचा हवाला –
🚨 LMAO! The Trump Card always wins!
“Thank you to FIFA for doing what was right, and reversing a great injustice! President DONALD J. TRUMP”
Folarin Balogun is BACK 🇺🇸 pic.twitter.com/pmrsuba9SU
— Eric Daugherty (@EricLDaugh) July 5, 2026
युरोपियन फुटबॉलची सर्वोच्च संस्था UEFA ने देखील फिफावर कडक शब्दांत टीका केली आहे. UEFA ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, “जागतिक फुटबॉल नियामक संस्थेने सर्व मर्यादा (रेड लाईन) ओलांडल्या असून खेळण्याच्या प्रामाणिकपणाला कमकुवत केले आहे.”
दुसरीकडे, फिफाने आपल्या निर्णयाचा बचाव करताना ‘डिसिप्लिनरी कोड’च्या आर्टिकल २७ चा हवाला दिला आहे. फिफानुसार, बालोगनचे सस्पेंशन एका वर्षाच्या प्रोबेशनरी कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे. यापूर्वी पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर क्वालिफायर सामन्यात मिळालेल्या थेट रेड कार्डनंतरचा ३ सामन्यांचा बॅन अशाच प्रकारे टळला होता, अशी आठवणही फिफाने करून दिली आहे.





