Donald Trump: ट्रम्प यांच्या डिनर कार्यक्रमात झालेल्या गोळीबारावर भारताची पहिली प्रतिक्रिया, पंतप्रधान मोदी म्हणाले,”लोकशाहीतील हिंसाचार…”
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या स्नेहभोजनप्रसंगी झालेल्या गोळीबारावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या स्नेहभोजनप्रसंगी झालेल्या गोळीबारावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी बोलताना, “लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही आणि या घटनेचा निःसंदिग्धपणे निषेध केला पाहिजे” असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी, “वॉशिंग्टन, डीसी येथील हॉटेलमध्ये नुकत्याच घडलेल्या सुरक्षा घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे सुरक्षित आणि सुखरूप आहेत हे जाणून दिलासा मिळाला. मी त्यांच्या पुढील सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही आणि त्याचा निःसंदिग्धपणे निषेध केला पाहिजे.” असे म्हटले आहे.
व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या स्नेहभोजनप्रसंगी झालेल्या गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली आहे. शनिवारी स्नेहभोजनप्रसंगी गोळीबार झाला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प मंचावर होते. गोळीबाराच्या आवाजाने लोकांमध्ये घबराट पसरली आणि ते सैरावैरा पळू लागले.
Relieved to learn that President Trump, the First Lady and Vice President are safe and unharmed following the recent security incident at a Washington DC hotel. I extend my best wishes for their continued safety and well-being. Violence has no place in a democracy and must be…
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथआउट सोशल’वर पोस्ट करून , हल्लेखोराला पकडण्यात आले आहे आणि परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांनी सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे कौतुक केले. ट्रम्प यांनी लिहिले, “वॉशिंग्टन, डीसीमध्ये काय शानदार संध्याकाळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी उत्कृष्ट काम केले.”असे सांगितले.
नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल Donald Trump:
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले, “मी कार्यक्रम सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेन.” तथापि, नंतरच्या एका अपडेटमध्ये, ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी कार्यक्रमावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल. “मी कार्यक्रमाच्या सर्व प्रतिनिधींशी बोललो आहे आणि आम्ही ३० दिवसांच्या आत त्याचे पुनर्नियोजन करू,” असे ट्रम्प म्हणाले.






