Donald Trump : भारतावरील आयात शुल्कात वाढ करणार; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर

न्यूयॉर्क : भारताकडून अमेरिकेला दिले जाणाऱ्या आयात शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले. रशियाकडून भारत तेल आयात करत असून मोठ्या प्रमाणावर फायदा कमवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारत रशियाचे तेल केवळ मोठ्या प्रमाणात खरेदी करत नाही, तर ते खरेदी केलेल्या बहुतेक तेलासाठी ते खुल्या बाजारात मोठ्या नफ्यासाठी विकत आहेत.
रशियाच्या युद्धामुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत याची भारताला पर्वा नाही. यामुळे, भारताने अमेरिकेला दिलेल्या करात मी लक्षणीय वाढ करणार आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी जगभरातील देशांमधून होणाऱ्या निर्यातीवर वॉशिंग्टन लावणार असलेल्या विविध शुल्कांची यादी अलिकडेच प्रसिद्ध केली.
भारताला २५ टक्के कर आकारला जाईल, असे कार्यकारी आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत. तसेच, भारताने नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमध्ये होणारी हत्या थांबवावी अशी इच्छा आहे. असे ट्रम्प म्हणाले आहेत.





