डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनविरुद्ध मोठा निर्णय ! १० टक्के कर लावण्याची केली घोषणा ; जिनपिंग यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Donald Trump Tariffs China। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सरकार १ फेब्रुवारीपासून चीनवर १० टक्के कर लादण्याचा विचार करत असल्याची मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी बोलताना,”चीनवर शुल्क लादण्याचा निर्णय ते मेक्सिको आणि कॅनडाला फेंटानिल पाठवत आहे की नाही यावर आधारित असेल. फेंटानिल हे एक अंमली पदार्थ आहे जे हेरॉइनपेक्षा ५० पट जास्त शक्तिशाली आणि व्यसनाधीन आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ओरेकलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) लॅरी एलिसन, सॉफ्टबँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मासायोशी सन आणि ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यासमवेत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी “आम्ही चीनवर १०% कर लादणार आहोत,” तसेच आम्ही फेंटानिलवर बंदी घालण्याचा विचार करत आहोत, जी मेक्सिको आणि कॅनडा चीनला फेंटानिल पाठवतात या वस्तुस्थितीवर आधारित असेल” असे म्हटले आहे.
१ फेब्रुवारीपासून शुल्क लागू करण्याचा विचार Donald Trump Tariffs China।
एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी, आमचे प्रशासन १ फेब्रुवारीपासून शुल्क लागू करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “आम्ही मेक्सिको आणि चीनवर २५ टक्के कर लादण्याबद्दल बोलत आहोत.” दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प यांनी,”गेल्या आठवड्यात जेव्हा त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बोलले तेव्हा आम्ही करांबद्दल जास्त बोललो नाही.” असे म्हटले. तसेच “युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी शी जिनपिंग यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले होते का असे विचारले असता, ट्रम्प म्हणाले की चीनने या संदर्भात फारसे काही केले नाही असे त्यांनी म्हटले.
१० टक्के कर लादण्याचा विचार Donald Trump Tariffs China।
चीनवर १० टक्के कर लादण्याची डोनाल्ड ट्रम्पची कल्पना फेंटॅनिल पुरवठ्याच्या मुद्द्यावर आधारित आहे आणि ती अमेरिकेच्या व्यापार धोरणांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल असू शकते. या निर्णयाचा जागतिक बाजारपेठेवर आणि अमेरिका-चीन संबंधांवर खोलवर परिणाम होऊ शकतो.





