डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘मंदी आली तरी सरकार धोरण बदलणार नाही’

वॉशिंग्टन – दरम्यान शेअर बाजार कोसळत असल्यामुळे आणि महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेत आता मंदी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंदी निर्माण होणार आहे, असे तुम्हाला वाटते का, असे विचारले असतात ते म्हणाले की, अशा प्रकारची भाकिते करणे मला आवडत नाही.
आम्ही एक फार मोठे भव्य- दिव्य काम करीत आहोत. अशा परिस्थितीत हे केवळ स्थित्यंतर होत आहे. त्याचबरोबर मंदी निर्माण होण्याची शक्यता मी फेटाळत नाही. अर्थव्यवस्था हाताळणार्या व्हाईट हाऊसमधील विभागातील अधिकार्यांनी सांगितले की, आम्ही जे करणार आहोत ते साध्य करण्यासाठी प्रसंगी काही काळ मंदीचा सामना करावा लागला तरी हरकत नाही. दीर्घ पल्ल्यात अमेरिकेची अर्थव्यवस्था विस्तारेल. मात्र सध्याच्या परिस्थितीत काही नकारात्मक घटना घडू शकतात, असे अधिकार्यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाबरोबरच चीन, भारत, युरोपियन समुदायाविरोधात आयात शुल्क लावण्याची भाषा केली आहे. यामुळे जागतिक व्यापारात गोंधळ उडाला आहे. अधिकार्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना एखादा मोठा निर्णय घेण्यावेळी होत असतात. लवकरच परिस्थिती निवळेेल आणि आयात शुल्काबाबतचा संभ्रम कमी होईल. त्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल.





