पडत्या शेअर बाजारावर डोनाल्ड ट्रम्प यांचे एका वाक्यात भाष्य, म्हणाले…

Donald Trump On Share Market | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक शेअर बाजारात अनिश्चितता दिसून येत आहे. अचानक टॅरिफ लावणे व नंतर माघार घेणे, यामुळे भारतासह जगभरातील बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे.
या अस्थिरतेच्या स्थितीमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. त्यातच आता ट्रम्प यांनी एका वाक्यात शेअर बाजारावर भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, शेअर बाजारात खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे.
एकीकडे जगभरात शेअर बाजारात प्रचंड घसरण होत असताना, ट्रम्प यांनी अचानक असे ट्विट केल्याने याची चर्चा रंगली आहे. गेल्या चार दिवसात अमेरिकन बाजारात 6 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली आहे. आहे. या घसरणीचा मोठा फटका S&P 500 इंडेक्सला बसला आहे.
THIS IS A GREAT TIME TO BUY!!! DJT
Donald Trump Truth Social 04/09/25 09:37 AM
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) April 9, 2025
भारतासह इतर आंतरराष्ट्रीय बाजारांवरही त्याचा परिणाम झाला असून, गेल्या सोमवारी भारतीय शेअर बाजार जवळपास 4000 अंकांनी कोसळला होता.
टॅरिफ धोरणाला स्थगिती
दरम्यान, जगभरात व्यापार युद्ध सुरू झाले असे वाटत असतानाच अचानक ट्रम्प सरकारने अनेक देशांवर लावण्यात आलेल्या शुल्काला 90 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र चीनमधून होणाऱ्या आयातीवरील शुल्काचा दर त्यांनी वाढवत 125% पर्यंत नेला आहे.
काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी जाहीर केले होते की, आर्थिक धोरणं कधीही बदलणार नाहीत. त्यानंतर बाजारात प्रचंड घसरण दिसून आली होती. मात्र, आता टॅरिफ वाढ निर्णयाला 90 दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली आहे.





