ट्रम्पच्या मानसिकतेविषयी मानसशास्त्रज्ञांचा इशारा ; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमध्ये ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे

Donald Trump Health। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीबाबत पुन्हा एकदा चर्चा तीव्र झाली आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. हॅरी सेगल आणि डॉ. जॉन गार्टनर यांनी अलिकडेच त्यांच्या थिंकिंग ट्रम्प या कार्यक्रमात,”७९ वर्षीय ट्रम्प यांना डिमेंशियाची स्पष्ट लक्षणे दिसत आहेत” असा मोठा दावा केला आहे.
तज्ज्ञांच्या मते,ट्रम्प यांची प्रकृती हळूहळू बिघडत चालली आहे आणि त्यांना फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया (FTD) असू शकते. हा आजार मेंदूच्या पुढच्या आणि बाजूच्या भागांवर परिणाम करतो, ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन, भाषा आणि मोटर कौशल्यांवर परिणाम होतो.” असे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या वर्तनात आणि चालण्यात बदल Donald Trump Health।
डॉ. गार्टनर यांनी,”ट्रम्प यांच्या सायको-मोटर वर्क सिस्टीममध्ये स्पष्ट घट झाली आहे. त्यांनी सांगितले की FTD चे एक लक्षण आहे, ज्याला वाइड-बेस्ड गेट म्हणतात. यामध्ये चालताना एक पाय असामान्यपणे हलतो.”असे म्हटले आहे. अलिकडेच अलास्कामध्ये ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. यामध्ये ट्रम्प रेड कार्पेटवर डगमगताना दिसले. डॉ. गार्टनर म्हणाले, “त्यांचा उजवा पाय त्यांना डावीकडे ढकलत होता आणि नंतर ते तोल साधण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला जात होता. जर ही दारू पिऊन गाडी चालवण्याची चाचणी असती तर तेअयशस्वी झाला असते ” असे म्हटले. डॉ. सेगल यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की ट्रम्प दारू पिऊन दिसत नव्हते, परंतु तरीही त्याच्या पायावरील नियंत्रण गमावत होते.”
फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया म्हणजे काय? Donald Trump Health।
फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया (FTD) हा एक असामान्य प्रकारचा डिमेंशिया आहे ज्यामध्ये मेंदूच्या पुढच्या आणि टेम्पोरल भागांवर परिणाम होतो. तो एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर, भावनांवर, सामाजिक संवादावर आणि भाषेवर परिणाम करतो. हा आजार हळूहळू वाढतो आणि वर्षानुवर्षे गंभीर स्वरूप धारण करतो. प्रमुख लक्षणांमध्ये वर्तनात बदल, निर्णय घेण्याची क्षमता नसणे, विचित्र चाल आणि भाषेच्या समस्या यांचा समावेश आहे.
ट्रम्पचे अलीकडील वर्तन आणि चालण्याचे बदल या लक्षणांशी जुळतात. ट्रम्पचा प्रतिसाद आणि वैद्यकीय दावे या दाव्यांनंतरही, डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार त्यांच्या संज्ञानात्मक क्षमतेचे कौतुक केले आहे. एप्रिलमध्ये त्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांनी असा दावा केला की त्यांनी संज्ञानात्मक चाचणीत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. तथापि, डॉ. सेगल आणि डॉ. गार्टनर म्हणतात की ही चाचणी खूप सोपी आहे आणि ती उत्तीर्ण होणे ही मोठी कामगिरी मानली जाऊ शकत नाही. ट्रम्प यांचे अलीकडील वर्तन आणि वागणूक एका गंभीर आरोग्य समस्येकडे लक्ष वेधत आहे असे त्यांचे मत आहे.





