Donald Trump: अमेरिका पुन्हा एकदा हादरली ! व्हाइट हाऊसजवळ गोळीबार ; ट्रम्प थोडक्यात बचावले
Donald Trump: वॉशिंग्टन डीसी येथे 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना व्हाइट हाऊसजवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय.

Donald Trump: वॉशिंग्टन डीसी येथे ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन’च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना व्हाइट हाऊसजवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडलीय.
शनिवारी संध्याकाळी व्हाइट हाऊसच्या नॉर्थ लॉनजवळ गोळीबार झाल्याची मोठी घटना घडली. यात सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू आले. ही घटना 17th Street आणि परिसरात घडली. दरम्यान या घटनेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहे. मात्र पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेनं अमेरिका हादरलं असून राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अमेरिकेत शनिवारी व्हाईट हाऊसजवळ एक व्यक्ती सुरक्षा चौकीजवळ आला. त्यानंतर त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात, संशयित व्यक्ती सुरक्षा चौकीजवळ आला, त्याने आपल्या बॅगेतून शस्त्र बाहेर काढले आणि त्याठिकाणी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, या दरम्यान सुमारे ३० गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली.
यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या कम्युनिकेशन ऑफिसने ट्विट करत, “शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर थोड्याच वेळात, एका व्यक्तीने आपल्या बॅकपॅकमधून शस्त्र काढून १७ व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यूच्या परिसरात गोळीबार केला. सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि संशयिताला गोळ्या घातल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या गोळीबारात एक वाटसरूही जखमी झाला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये होते,” असे म्हटले आहे.
प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून गोळीबार Donald Trump:
सिक्रेट सर्व्हिसने, अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि संशयिताला गोळ्या घातल्या. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे नंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.
गोळीबारात एक वाटसरूही जखमी झाला
या घटनेत एक वाटसरूही जखमी झाला. तथापि, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्या वाटसरूला संशयिताने गोळी मारली की प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Preliminary statement regarding the shooting incident on 17th Street and Pennsylvania Avenue. pic.twitter.com/VK6WWAfH3e
— U.S. Secret Service (@SecretService) May 24, 2026
सिक्रेट सर्व्हिसने कळवले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये होते, परंतु या घटनेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. एजन्सीने असेही सांगितले की, त्यांचा कोणताही कर्मचारी जखमी झाला नाही. अधिकारी जखमी झाला नाही. जखमी.
एफबीआय संचालकांनीही माहिती दिली
एफबीआय संचालक काश पटेल यांनीही सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अधिकारी गोळीबाराच्या घटनेला प्रतिसाद देत आहेत आणि माहिती उपलब्ध होताच जनतेला अद्ययावत माहिती दिली जाईल.
मेट्रोपॉलिटन पोलीस विभागानेही त्यांच्या एक्स (X) खात्यावर पोस्ट करून सांगितले की, सिक्रेट सर्व्हिस संपूर्ण परिसरात मोहीम राबवत आहे. पोलिसांनी लोकांना त्या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत Donald Trump:
ज्या भागात शनिवारी गोळीबार झाला, त्याच ठिकाणी गेल्या नोव्हेंबरमध्ये एक हल्ला झाला होता. एका बंदूकधाऱ्याने वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डच्या दोन सदस्यांवर हल्ला केला होता. त्या घटनेत यूएस आर्मी स्पेशालिस्ट सारा बेकस्ट्रॉम ठार झाल्या, तर अँड्र्यू वुल्फ गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकरणात रहमानुल्ला लकनवाल यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर सुरक्षा वाढवली
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या एका महिन्यानंतर ही घटना घडली आहे. २५ एप्रिल रोजी वॉशिंग्टनमधील एका हॉटेलमध्ये आयोजित व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या डिनरदरम्यान ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता.
कॅलिफोर्नियाचा रहिवासी कोल थॉमस ॲलन याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याने नुकतेच न्यायालयात आपण निर्दोष असल्याचे सांगितले असून तो सध्या केंद्रीय कोठडीत आहे.





