अमेरिकाचा भारताला मोठा धक्का! २ एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू करणार ; वाचा ट्रम्प यांच्या भाषणातील १० महत्त्वाच्या गोष्टी

Donald Trump Adressed Congress। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील संपूर्ण योजनेची झलक सादर केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांसाठी अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि जागतिक सहकार्य मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रमुख प्राधान्यक्रमांची रूपरेषा सांगताना त्यांनी,”त्यांचे प्रशासन अमेरिकेच्या सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य देईल” असे म्हटले.
देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणात बदल
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या काही आठवड्यात आर्थिक पुनर्प्राप्ती, आरोग्यसेवा व्यवस्थेतील बदल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधांवर लक्ष केंद्रित करून उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकला. त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे केवळ अमेरिकन नागरिकांचे राहणीमान उंचावेल असे नाही तर अमेरिकेची जागतिक नेतृत्व भूमिकाही बळकट होईल, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसला संदेश
ट्रम्प यांनी काँग्रेसला त्यांच्या धोरणांना पाठिंबा देण्याचे आणि अमेरिकेला एक मजबूत आणि समृद्ध देश बनविण्यास मदत करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “हीच वेळ आहे जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या हितासाठी काम केले पाहिजे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगले भविष्य सुनिश्चित केले पाहिजे.”
भारत आणि चीनविरुद्ध परस्पर शुल्क Donald Trump Adressed Congress।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका २ एप्रिल रोजी भारत आणि चीनसह इतर देशांवर परस्पर शुल्क लादेल. ते म्हणाले, इतर देश आपल्यावर जो कोणताही कर लावतील, आम्ही त्यांच्यावर आम्ही तसाच कर लावू. इतर देशांनी गेल्या अनेक दशकांपासून आपल्याविरुद्ध शुल्क आकारले आहे आणि आता त्या इतर देशांविरुद्ध शुल्क आकारण्यास सुरुवात करण्याची आपली वेळ आहे.” असे म्हणत त्यांनी भारतावर परसपसर कर लादणार असल्याची घोषणा केली.
पुढे बोलताना त्यांनी,”युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत आणि इतर असंख्य देश आमच्याकडून खूप जास्त दर आकारतात. हे खूप अन्यायकारक आहे. भारत आमच्याकडून १०० टक्के कर आकारतो. ही व्यवस्था अमेरिकेसाठी योग्य नाही. हे कधीच घडले नाही. ते म्हणाले की, परस्पर शुल्क २ एप्रिलपासून लागू होणार आहे. जर त्यांनी आम्हाला त्यांच्या बाजारपेठेपासून दूर ठेवण्यासाठी गैर-मौद्रिक शुल्क लादले, तर आम्ही त्यांना आमच्या बाजारपेठेपासून दूर ठेवण्यासाठी गैर-मौद्रिक शुल्क लादू.” असा इशारा देखील ट्रम्प यांनी यावेळी दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे Donald Trump Adressed Congress।
* अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “अमेरिकन स्वप्न अजिंक्य आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विजयाचे कौतुक केले आणि त्याला अनेक दशकांमध्ये न पाहिलेला जनादेश म्हटले.
* काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, आता अमेरिकेत फक्त दोनच लिंग असतील, पुरुष आणि महिला. त्यांनी महिलांच्या खेळांमध्ये पुरुषांना सहभागी होण्यावर बंदी घालण्याची घोषणाही केली.
*ट्रम्प म्हणाले की त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि इंग्रजी ही अमेरिकेची एकमेव अधिकृत भाषा म्हणून घोषित केली.
* ट्रम्प यांनी घोषणा केली की मेक्सिकोच्या आखाताचे नाव आता अमेरिकेचे आखात असे करण्यात आले आहे.
*राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल जाहीर केले: “आम्ही घेतलेल्या प्रत्येक नवीन निर्णयासाठी, आम्ही १०० जुने निर्णय उलटवू.”
*ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या त्या धोरणांना रद्द करण्याबद्दल बोलले, जे त्यांच्या मते देशासाठी फायदेशीर नव्हते. ते म्हणाले की, मागील प्रशासन चार वर्षांत जे करू शकले नाही ते त्यांच्या सरकारने ४३ दिवसांत केले.
*“अमेरिका परत आली आहे,” ट्रम्प अभिमानाने म्हणाले. आता अमेरिकेचा अभिमान, उत्साह आणि आत्मविश्वास परत आला आहे.
*त्यांनी असेही म्हटले की DOGE ने यामध्ये उत्तम काम केले आहे आणि त्यांच्या सरकारने अनेक हास्यास्पद धोरणे रद्द केली आहेत.
*ट्रम्प यांच्या भाषणानंतर, डेमोक्रॅटिक पक्षाने राष्ट्रपतींना टक्कर देण्यासाठी सिनेटर एलिसा स्लॉटकिन यांना उमेदवारी दिली आहे.
*ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून भारत आणि चीनविरुद्ध परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क लादले होते. ट्रम्प म्हणाले, “कॅनडा, मेक्सिको, भारत आणि दक्षिण कोरिया बरेच शुल्क लादतात. आम्ही २ एप्रिलपासून कॅनडा, मेक्सिको, चीन आणि भारतावर परस्पर कर लादणार आहोत. जे आपल्यावर कर लादतात, आम्ही त्यांच्यावरही तेवढाच कर लादू.





