ट्रम्पने अमेरिकन लोकांनाच दाखवला देशाबाहेरचा रास्ता ; कोणाला हद्दपार करणार ? वाचा

Donald Trump। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी काही अमेरिकन नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचे समर्थन केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी, “ज्या लोकांनी “बेसबॉल बॅटने एखाद्याला मारणे” असे गंभीर गुन्हे केले आहेत, त्यांना अमेरिकेतून हद्दपार केले पाहिजे, जरी ते याठिकाणी जन्मलेले असले तरीही.” असे म्हटले आहे.
गुन्हे करणाऱ्याना देशाबाहेर काढण्याचा मानस Donald Trump।
फ्लोरिडामधील एका स्थलांतरित बंदी केंद्राला भेट दिली त्यावेळी त्यांनी, “हे लोक आपल्या देशात नवीन नाहीत. ते इथलेच आहेत. त्यापैकी बरेच जण याठिकाणी जन्मले आहेत,” असे ट्रम्प यांनी सांगितले. गंभीर गुन्हे करणाऱ्या नागरिकांनाही देशाबाहेर काढण्याचा त्यांचा मानस असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले. त्यांनी हे त्यांच्या पुढच्या सरकारचे ध्येय म्हटले.
मात्र , अमेरिकन कायद्यानुसार, जन्माने नागरिकत्व मिळवणाऱ्या व्यक्तीला फसवणुकीद्वारे नागरिकत्व मिळाले नसल्यास देशातून हद्दपार करता येत नाही. ट्रम्प यांच्या या विधानावर मानवाधिकार संघटना आणि अनेक कायदेतज्ज्ञांनी टीका केली आहे.
ट्रम्पकडून न्यूयॉर्क शहराचा उल्लेख Donald Trump।
डोनाल्ड ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत. न्यू यॉर्क शहराचा उल्लेख करताना त्यांनी, त्याठिकाणी अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या अपघात नसून जाणूनबुजून केलेले गुन्हे होते.”असे म्हटले. त्यांनी पुढे बोलताना,”जरी आपण इतर सर्व काही विसरलो तरी, न्यू यॉर्कमध्ये काही खूप वाईट गोष्टी घडल्या आहेत आणि त्या अपघात नव्हत्या.”असे म्हणत त्यांनी टीका केली.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे हे विधान केवळ संवैधानिक वाद निर्माण करत नाही तर निवडणुकीच्या वर्षात त्यांचा कायदा आणि सुव्यवस्थेचा अजेंडा पुन्हा चर्चेत आणत आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर टीका करताना, मानवाधिकार संघटनांनी याला असंवैधानिक आणि धोकादायक कल्पना म्हटले आहे.
हेही वाचा
मध्यमवर्गीयांना आता GST मधून दिलासा? ; सरकारची १२% ऐवजी ५% स्लॅबची तयारी ?





