AB de Villiers : ‘मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत घेतो…!’, एबी डिव्हिलियर्सचे धोनीबाबत मोठं वक्तव्य, VIDEO होतोय व्हायरल
एबी डिव्हिलियर्सचे धोनीबाबत मोठे वक्तव्य –
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि डब्ल्यूसीएल 2025 च्या विजेत्या संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक मजेदार वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये डिव्हिलियर्स म्हणाला, “मी सध्या 41 वर्षांचा आहे.” जेव्हा त्याला सांगण्यात आले की धोनी 44 वर्षांचा आहे, तेव्हा तो हसत हसत म्हणाला, “माझी त्याच्याशी तुलना करू नका, मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत घेतो.” नंतर त्यांनी हसत हसत सांगितले की तो मजा करत होता.
“Dont compare me with him i work a lot more harder” 😭pic.twitter.com/CyKsvHqPwU https://t.co/ndm3rpzFQ0
— Advit’ (@Advitxvirat) August 3, 2025
एबी डिव्हिलियर्स आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) ला समर्थन देण्यासाठी भारतात आला होता. डिव्हिलियर्सने बराच काळ आरसीबीकडून आयपीएल खेळले असून, त्याची विराट कोहलीसोबत घनिष्ठ मैत्री आहे. आरसीबने खिताब जिंकल्यानंतर डिव्हिलियर्स खूप आनंदी दिसत होता. एका मुलाखतीदरम्यान त्यानी आयपीएलच्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ प्लेइंग इलेव्हनची निवडही केली.
हेही वाचा – IND vs ENG : जो रुटचा ऐतिहासिक पराक्रम! डब्ल्यूटीसीमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
धोनीला बनवले आयपीएलच्या सर्वकालीन संघाचा कर्णधार –
एबी डिव्हिलियर्सने निवडलेल्या आयपीएलच्या सर्वकालीन सर्वश्रेष्ठ संघात सात भारतीय आणि चार परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. या संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे सोपवले. यात विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन, श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल विटोरी आणि स्वत:ला या संघात स्थान दिले आहे. डिव्हिलियर्सने सांगितले की, हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक संघ आहे.





