DoctorG Trailer Out : आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – बॉलीवूडचा देखणा अभिनेता आयुष्मान खुराना याने अलीकडेच त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल-2’ चित्रपटाची एक उत्तम झलक शेअर केली आहे. चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.
आता आयुष्मानने ‘डॉक्टर जी’चा ट्रेलर लॉन्च केला आहे. चित्रपट निर्मात्यांनी याबद्दल माहिती दिली होती की ते 20 सप्टेंबर रोजी ट्रेलर रिलीज करणार आहेत. आणि एक फोटो देखील शेअर केला आहे.
‘डॉक्टर जी’ चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे आणि प्रेक्षक या ट्रेलरवर लाईकचा वर्षाव करत आहे. अनुभूती कश्यप दिग्दर्शित ‘डॉक्टर जी’ चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडीने भरलेला आहे.
मधल्या काळात आलेला आयुष्मान खुरानाच्या विकी डोनरच्या कथेची आठवण करून देतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आयुष्मानने सिद्ध केले आहे की तो अशा भूमिकेसाठी बनला आहे. आयुष्मानसोबत या चित्रपटात शेफाली शाह आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.
आयुष्मानने यासंदर्भात एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये तो स्ट्रेचरवर पडून आहे. आयुष्मानने पोस्टर शेअर करत लिहिले की, ऑर्थोपेडिस्ट होण्याचे स्वप्न होते पण स्त्रीरोगतज्ञ बनून स्वप्न संपले, मुलीच्या विभागात एकच मुलगा. डॉक्टरजी समजले’. हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.





