तुम्हाला माहिती आहेत का भारतातील ‘ही’ सात श्रीमंत मंदिरं ; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हे’ मंदिर

Rich temples । केरळातील पद्मनाभ स्वामी मंदिर ते जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णव देवी पर्यंत भारतातील अनेक मंदिरांकडे प्रचंड धनसंपत्ती साठलेली आहे. भारतातील अशा सात मंदिरांविषयी…
भारताला मोठा सांस्कृतिक अध्यात्मिक आणि बहुविधतेचा वारसा लाभलेला आहे. देशभरात सुमारे छोटे-मोठे मिळून पाच लाख मंदिरे आहेत. त्यावरूनच भारतातील धार्मिक महत्त्व आणि प्रथा-परंपरांचे महत्व कळून येते. मंदिरांच्या रूपाने उभे असलेली ही प्राचीन वास्तूरचना आणि शिल्पकला आता पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागलेली आहे. हजारो भाविक मंदिरांना दरवर्षी भेटी देतात.
श्रद्धेबरोबरच तेथील कलाकुसर आणि शिल्पकलेचेही कौतुक करतात. त्या व्यतिरिक्त भारतातील काही मंदिरांकडे प्रचंड धनसंपत्ती साठलेली आहे. या मंदिरांकडील संपत्तीचे निव्वळ मूल्य लाखो कोटींमध्ये आहे. या ठिकाणी पर्यटक आणि भावी श्रद्धेने येतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना देवाकडे करता.त अशा मंदिरांच्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळे महोत्सव आणि उत्सव साजरे होऊ लागलेले आहेत. त्यानिमित्ताने भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान म्हणून या मंदिरांना देणग्या दिल्या जातात. तशाच प्रमाणे त्या ठिकाणी असणाऱ्या दानपेटी आणि हुंड्यांमध्ये देखील लोक मोठ्या प्रमाणावर पैसे टाकतात. अगदी एक रुपयांपासून एक कोटींपर्यंतची ही रक्कम असते. या दान पेट्यांमध्ये अनेकदा सोन्याचे दागिने हिऱ्यांचे दागिने आणि अन्य हजारो कोटींचा खजिना देखील आलेला असतो. आज आपण भारतातील सात सर्वात श्रीमंत मंदिरांविषयी जाणून घेऊ या…
१) पद्मनाभ स्वामी मंदिर, केरळ – केरळ मधील तिरूअनंतपुरम या ठिकाणी असलेले पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिराकडे असलेल्या एकूण संपत्तीचा अद्यापही ठाव लागलेला नाही. अंदाजे या मंदिराकडे एक ट्रिलियन रुपये एवढी संपत्ती असावी असे सांगितले जाते. या मंदिरात अनेक बंदिस्त गुप्त अशी दालने आहेत आणि त्या ठिकाणी हजारो कोटी रुपयांचे दागदागिने, हिरे, माणके आणि दुर्मिळ मूर्ती असा खजिना दडलेला आहे. या मंदिरातील भगवान विष्णूला लोक सोन्याचे मुकुट, दागिने, वेगवेगळ्या मूर्ती दान करत असतात. पद्मनाभ स्वामी टेम्पल ची एकूण संपत्ती सुमारे एक लाख वीस हजार कोटी रुपये आहे.
२) तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश – भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुमला तिरुपती येथील बालाजी मंदिराचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी असणारे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर हे साधारणपणे दहाव्या शतकात बांधण्यात आलेले आहे. हे मंदिर देशभरातील भाविकांमध्ये अतिशय श्रद्धास्थान मानले जाते. रोज सुमारे या ठिकाणी 30000 भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराला हुंड्या वा दानपेटी तसेच देणगी रूपाने रोज लाखो रुपयांची कमाई होत असते. या मंदिराकडे सुमारे 52 टन सोन्याचे दागिने आहेत. दरवर्षी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांपैकी 3000 किलो दागिने देवस्थानकडून वितळवले जातात आणि ते सोने राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्यात येते. तिरुपती बालाजी देवस्थानच्या संपत्तीचे निव्वळ मूल्य 650 कोटी रुपये एवढे आहे.
३) माता वैष्णोदेवी मंदिर, जम्मू – देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत श्रीमंत देवस्थान म्हणून माता वैष्णव देवी मंदिराची ओळख आहे. कटरा या ठिकाणापासून 14 किलोमीटर अंतरावर आणि 5200 फूट उंचीच्या डोंगरावर हजारो वर्षांपूर्वी बांधलेले मंदिर आहे वैष्णव देवी मंदिर समितीला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मागील पाच वर्षांमध्ये भाविकांनी शेकडो किलो सोने माता वैष्णोदेवीला अर्पण केलेले आहे. त्यातून देवस्थाने सुमारे 1.2 टन एवढा सोन्याचा साठा राखीव म्हणून बँकेत ठेवलेला आहे. दरवर्षी देवस्थानला सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या देणग्या मिळतात.
४) शिर्डी साईबाबा मंदिर – भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान म्हणून महाराष्ट्रातील शिर्डी येथील साईबाबा संस्थानची ओळख आहे. या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून दरवर्षी लाखो भाविक येत असतात. साईबाबांवर श्रद्धा असणारा मोठा भाविकवर्ग देशात तसेच परदेशात आहे. शिर्डीमधील साईबाबा देवस्थान हे लोकोपयोगी कामे आणि धर्मादाय कामे करण्यात नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. देवस्थानच्या बँक अकाउंटच्या माहितीनुसार संस्थानकडे 1800 कोटी रुपये बँकेत आहेत त्याखेरीस 380 किलो सोने 4428 किलो चांदी आणि अन्य डॉलर आणि पाउंड मधील रोकड संस्थानकडे आहे.
५) गुरुवायूर मंदिर, केरळ – केरळ मधील गुरुवायूर शहरात हे मंदिर आहे. गुरु अयप्पन यांची मंगेश भगवान विष्णूचा अवतार अशी ओळख आहे. त्यांना कृष्णाचा अवतार असेही मानले जाते. गुरुवायूर या ठिकाणाला भू लोकांचे वैकुंठ असेही म्हटले जाते. या मंदिराची एकूण संपत्ती 2500 कोटी आहे. तसेच या मंदिराला दरवर्षी देणग्या व दानरुपाने 400 कोटी रुपये मिळतात.
६) सुवर्ण मंदिर, पंजाब – हे अतिशय पवित्र असे ठिकाण आहे. सुवर्ण मंदिराला श्री हरमंदिर साहेब असेही म्हटले जाते. या ठिकाणी पावित्र्य आणि धार्मिकतेचा संगम घडून आलेला आहे. युद्ध आणि संघर्षाच्या काळानंतर १८३० मध्ये महाराजा रणजीत सिंग यांनी संगमरवर आणि सोन्याचा वापर करून या मंदिराची पुन्हा उभारणी केली. या मंदिराकडील एकूण संपत्ती 500 कोटी रुपये एवढी आहे.
७) शबरीमला मंदिर, केरळ – हे ठिकाण अतिशय पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या संवेदनशील मानले जाते. हे मंदिर इतके श्रीमंत आहे, की त्या मंदिरात विविध सेवा देण्यासाठी रोबोटचा वापर केला जाणार अशा अफवा अधून मधून सांगितल्या जातात. या मंदिरावर अनेक ठिकाणी रोषणाई केली जाते. सात मीटर उंचीचा दीपस्तंभ आणि अन्य दीपमाळा जेव्हा प्रज्वलित केल्या जातात तेव्हा या ठिकाणचे दृश्य पाहण्यासारखे असते. हे मंदिर भगवान अय्यप्पा यांचे आहे आणि दरवर्षी लाखो भावी या ठिकाणी दर्शनासाठी येतातय या मंदिराकडे 15 किलो सोने आहे. तसेच मंदिराला दरवर्षी 105 कोटी रुपयांच्या देणग्या मिळत असतात. या मंदिराच्या संपत्तीचे एकूण मूल्य 245 कोटी रुपये एवढे आहे.





