‘कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी त्यांना माहित आहे का?’
Updated On:

नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकांवरून मोठा वाद निर्माण झाला असून या विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. विविध राज्यांतून दिल्लीकडे निघालेले शेतकऱ्यांनी राजधानीत प्रवेश मिळत नसल्याने सीमांवर ठिय्या मांडला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा नसल्याने मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या या बंदला काँग्रेसने पाठींबा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर निशाणा साधला.
काय म्हणाले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी
मी राहुल गांधींना विचारू इच्छितो की, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी ठाऊक आहे का?,





