चांगल्या परफॉर्मन्सचे प्रेशर घ्यायचे नाही- कीर्ति कुल्हारी

आगामी सिनेमात पूर्वीपेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचे कोणतेही प्रेशर घ्यायला आपल्याला आवडत नाही, असे अभिनेत्री कीर्ति कुल्हारीने म्हटले आहे. अशा प्रकारे प्रेशर घेतले, तर चांगले होणारे काम देखील बिघडू शकते, असा तिचा दावा आहे. या वर्षाची सुरुवात कीर्ति कुल्हारीसाठी चांगली झाली. “उरी’ आणि “फोर मोअर शॉट्‌स प्लीझ’ या दोन्ही सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे.

याशिवाय तिने काम केलेली शॉर्ट फिल्म “माया’ फिल्म फेअर ऍवॉर्डच्या शॉर्ट फिल्म श्रेणीमध्ये कीर्तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. याच संदर्भाने तिने आपली भूमिका स्पष्ट केली. अधिक चांगले काम करण्याबाबत सतत सतर्क राहिल्यामुळे आपल्यावर सततच एकप्रकारचे प्रेशर कायम राहते. लोकांच्या आपल्याकडून अधिक चांगल्या कामाच्या अपेक्षा आहेत, याची जाणीव स्वतःला करून घेतल्यामुळेच हे प्रेशर येते, असे कीर्ति म्हणते.

ती स्वतःवर कोणतेही प्रेशर कधीच येऊ देत नाही. कारण प्रेशर घेऊन ती कधीच कोणतेही काम चांगले करू शकत नाही. चांगले काम करण्यासाठी तणावमुक्‍त वातावरण मिळणे गरजेचे आहे, असे तिचे म्हणणे आहे. नेटफ्लिक्‍सवरच्या “बार्ड ऑफ ब्लड’मध्ये कीर्ति दिसणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×