महसूल विभागाला दिवाळी पावली…
Updated On:

पुणे –दिवाळी सणाच्या मुहुर्तावर घराचे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिक घर खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यानुसार मागील 15 दिवसांत राज्यात 1 लाख 35 हजार दस्त नोंदविण्यात आले असून, यातून 879 कोटी रुपयांचा महसूल राज्य शासनाला मिळाला आहे.
दिवाळीचा मुहुर्त साधत घर खरेदीचे दस्त नोंदवण्यास नागरिकांचा कल असतो. मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे नागरिक घर घेण्यासाठी पुढे येत आहेत.
राज्यभरात या आर्थिक वर्षात एकूण 9 लाख 66 हजार दस्त नोंदवण्यात आले असून त्यातून शासनाला 6 हजार 527 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर बुधवारी दिवसभरात 7 हजार 500 इतके दस्त नोंदवण्यात आहे. यातून सुमारे 41 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.





