Car Loan : दिवाळीत कार घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँकांचे कार लोन स्वस्त; जाणून घ्या व्याजदर आणि EMI
Car Loan : दिवाळीत कार खरेदीचा विचार करत असाल तर पंजाब अँड सिंध, SBI, HDFC, ICICIसह बँकांचे कार लोन व्याजदर, EMI आणि प्रोसेसिंग शुल्क जाणून घ्या.

Car Loan : दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकांनी कार लोनवर विविध ऑफर उपलब्ध केल्या आहेत. काही बँका 7.55 टक्क्यांपासून व्याजदराने कार लोन देत आहेत. तसेच काही ठिकाणी प्रोसेसिंग शुल्कात सवलत किंवा माफीही दिली जात आहे. ही माहिती 23 ऑक्टोबरपर्यंतच्या BankBazaar.com च्या आकडेवारीवर आधारित आहे.
कुठल्या बँकेचा किती व्याजदर?
पंजाब अँड सिंध बँकेत कार लोनचा व्याजदर 7.55 टक्क्यांपासून सुरू असून 14.30 टक्क्यांपर्यंत आहे. 5 लाख रुपयांच्या पाच वर्षांच्या कर्जासाठी EMI सुमारे 10,031 ते 11,712 रुपये असू शकते.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि कॅनरा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर 7.70 टक्के आहे. UCO बँकेचा दरही 7.70 टक्क्यांपासून सुरू होतो. इंडियन बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा सुरुवातीचा दर 7.75 टक्के आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7.75 टक्क्यांपासून कार लोन देत असून 31 डिसेंबर 2026 पर्यंत प्रोसेसिंग शुल्क माफ करण्याची सुविधा आहे.
बँक ऑफ बडोदाचा दर 7.85 टक्क्यांपासून, तर SBIचा 8.45 टक्क्यांपासून सुरू होतो. HDFC बँकेत हा दर 8.25 टक्के आणि ICICI बँकेत 8.40 टक्क्यांपासून आहे.
कर्ज घेण्यापूर्वी काय पाहावे?
कार लोनचा अंतिम व्याजदर ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि कर्ज फेडण्याची क्षमता यावर अवलंबून असतो. त्यामुळे केवळ कमी व्याजदर पाहून कर्ज घेण्याऐवजी EMI, प्रोसेसिंग शुल्क आणि इतर अटी तपासणे महत्त्वाचे आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती दिलेल्या स्रोताच्या आकडेवारीवर आधारित आहे. कर्ज घेण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अधिकृत अटी व शुल्क तपासा.)





