Divyanka Tripathi – टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने एक सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्चस्व गाजवते. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचप्रमाणे चाहत्यांनाही तिच्या स्टायलिश स्टाइलचे वेड लागले आहे.
तसेच, अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्वभावासाठीही ओळखली जाते. आणि म्हणूनच अभिनेत्रीचा चाहता वर्ग देखील प्रत्येक वयोगटातील आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री ओटीटीमध्ये विविध प्रयोग करताना दिसत आहे.
‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ या सीरिजमधील तिची स्क्रीनवरील राजीव खंडेलवाल याच्यासोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. ही सीरिज मोठ्या प्रमाणात पाहिली गेली. आता तिच्या जिओवरील ‘द मॅजिक ऑफ सीरि’ या वेब सीरिजमधील भूमिकेविषयी चर्चा होत आहे.
यात तिनं आईच्या भूमिकेचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवले आहेत. या भूमिकेची तयारी करण्याचा अनुभव दिव्यांका त्रिपाठीने नुकतंच प्रेक्षकांशी शेअर केला आहे. यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाले की, “आजकाल तरुण अभिनेत्रींना स्क्रीनवर आईची भूमिक साकारताना काही वावगं वाटत नाही, हा चांगला बदल आहे.
काही वर्षांपूर्वी वयाच्या पस्तीशी-चाळिशीनंतर अभिनेत्रींना काम मिळायचं बंद होत असे. ते चित्र वेबविश्वानं बदललं. कलाकार व्यापक दृष्टिकोनातून त्यांच्या कामाकडे, त्यांना विचारणा होणाऱ्या भूमिकांकडे पाहत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे’.
वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारण्याचा आनंद मिळाला. त्याला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. आणि वेबविश्वात सर्व वयोगटातील व्यक्तिरेखा लिहिल्या जात आहेत, ही या माध्यमाची सकारात्मक बाजू आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे या माध्यमाचे प्रेक्षकवर्गही विभिन्न वयोगटातील आहे’. असं देखील यावेळी दिव्यांका म्हणाली.
छोट्या आणि तिसऱ्या पडद्यावर नानाविध भूमिका साकारणारी दिव्यांका नेहमीच विश्लेषणात्मक मुद्दे मांडत असते. सपशेल मीडियावर देखील ती अधिक सक्रिय असून, समाजातील अनेक विषयावर आपले मत, भूमिका परखडपणे बोलून दाखवते.