इटलीत दिव्यांका त्रिपाठी – विवेक दहियाच्या झाली सामानांची ‘चोरी’

Entertainment । अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया इटलीमध्ये त्यांच्या कारची तोडफोड तसेच सामानाची चोरी झाल्याचे सांगितले आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत सांगितले आहे.
त्यांनी विदेशात जातांना कुंती काळजी घ्यावी याबाबत सांगितलं आहे. दिव्यांका इंस्टाग्राम स्टोरीज शेअर केलेल्या फोटोत हिरवाईत पार्क केलेल्या कारचा एक दरवाजा उघडा दिसत आहे. खिडकीच्या काचा फोडून त्याचे तुकडे मागच्या सीटवर विखुरलेले दिसत आहे. मागच्या सीटजवळ कागदी पिशवीच्या वर टोपी दिसली. नोटमध्ये दिव्यांकाने लिहिले की, ‘सध्याची परिस्थितीः सध्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये सविस्तर अहवाल तयार करत आहे.’
पुढे शेअर केलेल्या क्लिपमध्ये विवेक दहिया म्हणाला, ‘हे एक सुरक्षित ठिकाण असायला हवं होतं. आमच्या गाडीत सामान आहे हे हॉटेलवरच्या लोकांना माहीत होतं. नंतर लक्षात आले की आपण सर्वस्व गमावले आहे. आमची कागदपत्रे – पासपोर्ट, रोख रक्कम आणि सर्व खरेदी सर्वच चोरीला गेले आहे’
दरम्यान, दिव्यांका आणि विवेक फ्लोरेन्समध्ये सुट्टी घालवत होते. ते इटालियन शहराजवळील एका रिसॉर्टमध्ये असताना चोरट्यांनी त्याच्या कारची खिडकी तोडली, ज्यामुळे त्याचा पासपोर्ट, रोख रक्कम आणि कार्ड हरवले. त्यामुळं आता त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.





