‘उतरन’ फेम टीना दत्ताच्या टॉपलेस फोटोंनी दाखवला जलवा; सोशल मीडियावर आग

‘उतरन’ फेम टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताने संस्कारी सूनेपासून ते ग्लॅमरस डॉलपर्यंत आपला जलवा दाखवला आहे. मालिका विश्वातून घराघरात पोहचलेली टीना सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.
शिमल्यातील अनेक टॉपलेस फोटो टीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. टीनाने गॅलरीच्या शेवटच्या फोटोमध्ये स्पोर्ट्स ब्रामध्ये दिसलीय. स्पोर्ट्स ब्रा आणि सनग्लासेस घालून टीना साइड पोज देताना दिसली आहे.
नेहमी सुसंस्कृत स्टाईलमध्ये झळकणारी टीना इंटरनेटवर तिच्या बोल्ड स्टाईलमुळेही चर्चेत असते. दररोज बिकिनी आणि स्विमसूटमधील फोटो शेअर करत ती बोल्डनेसची नवी ओळख करून देत असते.
अशातच टीना दत्ताने नुकताच स्वत:चे नवे टॉपलेस फोटो शेअर केले आहे. जे सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल होत आहे. टीनाने हे टॉपलेट फोटो शिमल्यात शूट केले आहेत. यात तिने अंगावर नुसती पांढऱ्या रंगाची चादर गुंडाळलेली दिसते. डोंगर रांगांच्यामधून सूर्याला बघून टीनाने अगदी साध्या फोटोला ग्लॅमरचा टच दिला आहे.
टॉपलेस फोटोच्या एक दिवस आधी टीनाने तिच्या मॅगजीन कव्हर फोटोशूटचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये टीना दत्ताने ओव्हरकोट परिधान केला आहे. मात्र या कोटच्या आत तिने काहीही परिधान केलेले नाही. या फोटोमध्ये टीना दत्ताने ना टॉप घातला आहे आणि ना ब्रा. तिचा हा फोटो इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तिने काळ्या शॉर्ट्ससह काळे सनग्लासेस कॅरी केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सेक्सी असणे म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत वागण्याची वृत्ती आहे.’
मालिकेत भोळ्याभाबड्या इच्छाची भूमिका साकारणाऱ्या टीनाचा हा अवतार आता चाहत्यांसाठी काही नवीन राहिला नाही. मात्र नेहमी नवीन हॉट आणि सेक्सी फोटो पोस्ट करत चाहत्यांनी ती अधिकचं वेड लावत आहे. टीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या वडिलांसोबत रील शेअर करत असते. दोघांचे खूपच मजेशीर व्हिडिओ अनेकांना आवडतात. टीनाला ‘उतरन’ या मालिकेमधून अधिक लोकप्रियता मिळाली. यामधील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.





