Sujat Ambedkar : कुंभमेळ्यासाठीचा ३५ हजार कोटींचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वळवावा : सुजात आंबेडकर
Sujat Ambedkar : महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भासह अनेक भागांत तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे.

Sujat Ambedkar : महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीत आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी तरतूद करण्यात आलेला सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत केली. (Sujat Ambedkar)
आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, मराठवाडा आणि विदर्भात हवा तसा पाऊस झालेला नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा वेळी सरकारचे प्राधान्यक्रम चुकले आहेत. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचे बजेट मंजूर केले जात आहे. मात्र बळीराजा संकटात असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. (Sujat Ambedkar)
तुम्ही कितीही मोठा कुंभमेळा केला, साधू-बाबांना बोलावले, मोठा प्रसाद केला किंवा कि तीही मोठे बजेट ठेवले, तरी शेतकरी मरत असताना देव तुम्हाला कधीही पावणार नाही. त्यामुळे धार्मिक उत्सवांवर हजारो कोटींचा खर्च करण्याऐवजी सरकारने संवेदनशील राहून हा सर्व निधी दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी खर्च करावा. (Sujat Ambedkar)
राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळी स्थिती रोखण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत. अन्यथा, वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशाराही यावेळी आंबेडकर यांनी दिला. (Sujat Ambedkar)


