Satara | जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सरदार माने महाविद्यालय द्वितीय

रहिमतपूर, (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठांतर्गत कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्यामध्ये रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
आजरा, जि. कोल्हापूर येथे होणार्या शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी या संघांची निवड झाली आहे.
पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ. चित्रलेखा माने-कदम, सचिव डॉ. एच. एस. कदम, सदस्य हर्षवर्धन कदम, माउली एज्युकेअरच्या संचालिका सौ. प्रियंका कदम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. भाग्यश्री जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रकाश जगताप,
संघ व्यवस्थापक प्रा. कु. अक्षदा कोळी, प्रा. सौ. प्रतीक्षा कदम, प्रा. शिवाजी चव्हाण, प्रा. भानुदास मदने, प्रा. कु. निशा गायकवाड, प्रा. कु. कीर्ती कदम, प्रा. प्रतिभा गायकवाड, संजय पोळ, घनश्याम काथवटे, रवींद्र पवार यांनी यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.





