पुणे जिल्हा | वाघोली परिसरातील दिव्यांगांना व्हील चेअरचे वाटप
Updated On:

वाघोली, (प्रतिनिधी) -केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत वाघोली व परिसरातील दोन्ही पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना कृष्ण उत्सल सोशल फाउंडेशनच्या सहकार्यातून शिवजयंतीच्या दिवशी वाघोली येथे व्हीलचेअर व तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले.
दोन्ही पाय नसल्यामुळे रोजच्या जीवनात गरजा पूर्ण करण्यासाठी खूपच अडचणींना सामोरे जावे लागते. व्हीलचेअर मिळाल्यामुळे या गरजा पूर्ण करण्यासाठी वावरताना मोठ्या प्रमाणात अडचणी दूर होतील, असे लाभार्थी दिव्यांग बांधवांनी सांगितले.





