Pimpri : आदिवासी बांधवांना लोकोपयोगी साहित्य वाटप

खालापूर : भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी ग्रामपंचायत दूरशेत हद्दीतील तुरमाळ व देवन्हावे गावातील आदिवासी बांधवांना लोकोपयोगी साहित्य वाटप केले.
यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, वाहतूक सेल तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव, खालापूर शहराध्यक्ष दीपक जगताप, मोहन घाडगे, निलेश साळुंखे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर पांगारे, राहुल कडव, कुणाल शिंदे, शुभम सकपाळ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून गेल्या अनेक वर्षापासून मी समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या कार्यातून गरजूंना मदतीचा हात मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतो. यामुळे मला सामाजिक कार्य करण्यास ऊर्जा मिळत असून यापुढेही जेवढे शक्य होईल, तेवढे सामाजिक कार्य करत राहण्यास मी कटीबद्ध आहे.
– सनी यादव, रायगड जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा खालापुर तालुका प्रभारी अध्यक्ष सनी यादव हे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना गरजूना मदतीचा हात देतात. त्यांनी आपल्या वाढदिवस दिनी समाजोपयोगी कार्यक्रम राबविला. त्यांनी अनेक गरजूंना मदत केली. तसेच दरवर्षी वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य वह्या, दफ्तर, शालोपयोगी साहित्य देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.





