तुळापुर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
Updated On:

वाघोली – धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय तुळापुर या ठिकाणी पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले यांच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी माजी सरपंच रुपेश शिवले, माजी सरपंच गणेश पुजारी, माजी उपसरपंच राहुल राऊत, माजी चेअरमन राजाराम शिवले, माजी ग्रा.पं.सदस्य संजय चव्हाण, माजी उपसरपंच संतोष शिवले, माजीउपसरपंच पवन खैरे, भाजपा कामगार आघाडीचे उपाध्यक्ष संजय शिवले, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष व भाजपा हवेली उपाध्यक्ष अनिल शिवले, भाजपा सहकार आघाडी चे उपाध्यक्ष नवनाथ शिवले, राजेंद्र शिवले, आण्णासाहेब शिवले, दत्तात्रय शिवले, विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब जाधव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.





