स्टीलच्या बाटल्यांचे वाटप.. प्लॅस्टिकमुक्त, पर्यावरणपूरक वारी
Updated On:

पिंपरी – आषाढी वारी ही प्लॅस्टिक मुक्त आणि पर्यावरण पूरक हरितवारी व्हावी, ही संकल्पना घेऊन पर्यावरण संवर्धन समिती आणि आयआयसीएमआरच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शंभर स्टिलच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांना भक्ती शक्ती चौक निगडी येथे प्लॅस्टिकमुक्त पायी पालखी वारीनिमित्त वारकऱ्यांना पाणी पिण्यासाठी स्टीलच्या बाटल्या या वेळी वाटप करण्यात आल्या.
यावेळी ईसीएच्या अध्यक्षा विनिता दाते, सुदर्शन हसबनीस, शिकंदर घोडके, संगीता घोडके, सुभाष चव्हाण, मोनिका शर्मा, मीनाक्षी मेरूकर, तानाजी भोसले, कल्पना तळेकर, इंद्रजीत चव्हाण, अनिल दिवाकर, राहुल रावत, संतोष सानप आणि आयआयसीएमआर इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक अभय कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


