पिंपरी | सह्यादी विद्यार्थी अकादमीतर्फे शालेय साहित्याचे वाटप

कामशेत, (वार्ताहर) – मावळात सर्व ठिकाणी बुधवारी शाळा सुरू झाल्या. शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या व इतर मुलांचे शाळा प्रशासन, नागरिक, माजी विद्यार्थी व युवकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
जिल्हा प्राथमिक शाळा खडकाळे, तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ठिकठिकाणी खाऊ, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प, खाऊ व पेन देवून करण्यात आले. या वेळी सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे केदार डकवे, तेजस वाघवले, सहदेव केदारी, निखिलेश दौडे, चेतन वाघमारे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लहान मुलांना शाळेचा लळा लागावा यासाठी वर्गांमध्ये फुगे, गुलाबपुष्प याची सजावट करण्यात आली होती. तर, अनेक ठिकाणी फळे आकर्षक सजावटीत सजवून विद्यार्थ्यांच्या स्वागत संदेशाने स्वागत करण्यात आले.





