पुणे जिल्हा | खेडमधील 200 भजनी मंडळांना सतरंजी वाटप

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील 200 भजनी मंडळे व सेवाभावी संस्थांना सोलापूर येथून बनवून आणलेल्या सतरंजीचे व पाण्याचे जार वाटप केले.
बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संतोषनगर-भाम (ता.खेड) येथे दुपारी पायोनियर हॉस्पिटलच्या डॉक्टर पथकाने आरोग्य शिबिरात वारकर्यांची आरोग्य तपासणी करून औषध व गोळ्यांचे वाटप केले.अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी खेड आळंदीचे पवित्र भूमितील 85 कीर्तनकारांचा सन्मानचिन्ह, वारकरी उभा पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी हभप पंकज महाराज गावडे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर 200 भजनी मंडळाना सतरंजी व जारचे वाटप केले.कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांनी बुट्टे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी अनेकांनी त्यांना वह्या देऊन सत्कार केला.
यावेळी भाजपा किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, राम गावडे, शांताराम भोसले, माजी सभापती लक्ष्मण टोपे, अमोल पवार, बाजार समिती संचालक सोमनाथ मुंगसे, सागर मुर्हे, महेंद्र गोरे, जयसिंग भोगाडे, चंदन मुर्हे,
राजेंद्र सांडभोर, चांगदेव शिवेकर, अशोक उमरगेकर, रामदास भोसले, राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, शेखर शेटे, भगवान शेळके, डॉ. ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, मारुती शेळके, सुधीर मुंगसे, दशरथ गाडे, संजय रौंधळ, कैलास टाकळकर, दिलीप वाळके, पांडुरंग ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेते,तालुक्यातील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन शरद बुट्टे पाटील मित्र मंडळाचे सुनील देवकर, दत्तात्रय मांडेकर, विश्वास बुट्टे पाटील, रोहित डावरे पाटील, काळुराम पिंजन, शिवाजी डावरे पाटील, दत्तात्रय टेमगिरे, शरद निखाडे, संतोष कड यांनी केले.





