Satara | कृषि विभागामार्फत वाई तालुक्यात बांबू रोपांचे वितरण

वाई, (प्रतिनिधी) – वाई तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत वाई बांबू रोपांचे वितरण करण्यात आले.जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रदूषणामुळे मानवजात व पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे.
या मानव जातीला व पृथ्वीला वाचविण्यासाठी महत्त्वकांक्षी योजना कृषी विभाग मार्फत राष्ट्रीय बांबू मिशन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गत शेतकऱ्यांना बांबू या पिकाचे मानवेल व टूल्डा जातीच्या 34600 रोपांचे वितरण करण्यात आले.
वाई तालुक्यांमध्ये 90 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येत आहे. यामुळे शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारी बांबू शेती वाई तालुक्यांमध्ये भहरत आहे. यामुळे तालुक्याची ओळख हरित वाई अशी होणार आहे.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष बरकडे,तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडळ कृषी अधिकारी मेणवली विजय गायकवाड,मंडळ कृषी अधिकारी वाई रवींद्र बेलदार, मंडळ कृषी अधिकारी भुईंज निखिल रायकर तसेच कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व तालुक्यांतील बांबु लागवड करणारे शेतकरी उपस्थित होते.





