वाघोलीत 3333 तुळशीच्या रोपांचे वाटप; अष्टविनायक मित्र मंडळाने राबवला अभिनव उपक्रम

वाघोली (प्रतिनिधी) : रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवार यांचे औचित्य साधून अष्टविनायक मित्र मंडळ वाघोली यांच्या वतीने वाघेश्वर मंदिर परिसरात जवळपास 3333 तुळशीच्या रूपांचे वाटप करून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थित या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके, देवस्थानचे संचालक अनंत कटके, विक्रम वाघमारे,लक्ष्मीताई वाघमारे, माधवी वाघमारे,सागर दानी, पंकज काळे, प्रमोद काळे, सागर म्हस्के, तरण सिंग, गजानन पांचाळ, अनिकेत वाघमारे, यश वाघमारे, वृषभ कोठारी, प्रतिक वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्ष संवर्धनासाठी अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम राबवून सामाजिक जाणवेचा एक अनोखा आदर्श उभा करण्यात आला आहे. विविध सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षण करावे.
राजेंद्र सातव पाटील (अध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान वाघोली पुणे)





